क्राइममहाराष्ट्र

शेतकऱ्याचा आवाज दडपला! पालकमंत्र्यांना निवेदन देताना पोलिसांकडून धक्काबुक्की, जमिनीवर पाडले!

पोलीस न्यूज नेटवर्क । जालना
जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना देण्यासाठी आलेल्या एका शेतकरी आंदोलकाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्याने गचांडी धरून जमिनीवर पाडले. जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शनिवार, १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी दुपारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. ही बैठक आटोपून पंकजा मुंडे अमरावतीकडे निघाल्या असताना, गजानन उगले नावाचे शेतकरी निवेदन देण्यासाठी त्यांच्या दिशेने गेले. मात्र, यावेळी साबळे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने उगले यांना गचांडी धरून धक्का दिला. त्यामुळे उगले खाली पडले. इतकेच नव्हे तर, त्यानंतरही त्या पोलीस अधिकाऱ्याने उगले यांना सोडले नाही; त्यांना गर्दीतून अक्षरशः ढकलत बाहेर नेले. या घटनेनंतर पोलिसांनी उगले यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker