क्राइममहाराष्ट्र

 मटका बुक्की शिवलिंग अप्पा वीरचा जुगार अड्डा उध्वस्त

बुक्की शिवलिंगसह चार रायटर विरोधात गुन्हा दाखल,75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

पोलीस न्युज नेटवर्क/जालना
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अलंकार चौक परिसरात शिवलिंग अप्पा वीर हा बुक्की सदर बाजार पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करत चार चार रायटरच्या माध्यमातुन लाखो रुपयाचा कल्याण मटका जुगार घेत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने छापे मारी करत मटका बुक्की शिवलिंग अप्पा वीर सह चार एजंटा विरोधात गुन्हा दाखल करुन तब्बल  75 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी या ठिकाणाहुन जप्त केलाय.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध धंद्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाचे शैलेश म्हस्के आणि त्यांच्या टीमने काल सोमवारी विविध ठिकाणी मटका जुगार अड्यावर  छापे मारले,माञ सर्वात मोठा जूगार अड्डा हा अलंकार चौकात शिवलिंग अप्पा वीर हा घेत होता,पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करुन हा अड्डा राजरोस पणे सुरु होता,या अड्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी या अड्यावर छापेमारी करत पोलीस उपनिरिक्षक शैलेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन बुक्की शिवलिंग अप्पा वीर याच्या सह
 शिवम प्रकाश नामदे वय 28 वर्ष रा. कबाडी मोहत्ला जालना, सय्यद युनुस सय्यद बशीर वय 54 वर्ष रा. मंगळ बाजार जालना आणि जगदीश रामप्रसाद तिवारी वय 49 वर्ष चरा. गायत्रीनगर जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली,त्यांच्या ताब्यातुन मोबाईल,रौख आणि स्कुटी असा एकुण 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाखाली पोलीस उपनिरिक्षक शैलेश म्हस्के,रिमप्रसाद रंगे,जगन्नाथ जाधव,नजीर पटेल,दुर्गेश गोपणे,सह ईतरांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker