महाराष्ट्र

शहागडला संत श्री. मुक्ताई पालखीचे आगमन शहागडकरांनी घेतले पालखीचे दर्शन

महिलांची लक्षणीय दर्शनासाठी गर्दी

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील शहागड येथे गुरुवारी सकाळी संत श्री. मुक्ताबाई पालखीचे आगमन सकाळी शहागडला दाहा वाजता झाले. वडीग्रोद्री येथे मुक्ताबाई पालखी मुक्कामी पालखी मुक्कामी होती. राष्ट्रीय महामार्ग 52 वरण पालखीचे शहागडला आगमन होताच गावकऱ्यांनी सडा-सारवण रांगोळी फुलांचा वर्ष पालखीवर करण्यात आला, वारकऱ्यांच्या सोबत होऊन गाव वेशी जवळील हनुमान मंदिर वारकऱ्यांसाठी दाळ- भट्टीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता.संत एकनाथ चौक पैठण फाटा येथे हि नागरिकांनी चहा नाश्ता बिस्किट-केळीची व्यवस्था केलेली होती. दुपारी बारा वाजता शहा गड होऊन जालना जिल्ह्याचे हद्द सोडत पालखीने बीड जिल्हा गेवराई कडे प्रस्थान केलेले असून गेवराई येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. अबंड-घनसावंगी-तिर्थपुरी शहागड पोलिससह हायवे ट्राफिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता.

 

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे,गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, उपनिरीक्षक किरण हावले, जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हाजारे,गोपाल दिलवाले, सोनवणे गुरुजी,
गोपीनये शाखेचे सचिन साळवे, पो.का.शाकेर सिद्दीकी,दिपक भोजने,काळे,शेख, हिवाळे,बघाटे,राठोड सह महिला पोलिस कर्मचारी मोठ्या बंदोबस्त तैनात होता.

 

शहागड कडून गेवराई कडे मुक्ताईनगर (विदर्भ) येथून संत श्री. मुक्ताबाई पालखीचे आगमन होऊन गेवराईकडे पालखीचे प्रस्थान होत असताना. टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी जय हरी विठ्ठल मनात गोदावरी नदीचे दर्शन घेऊन, पालखीच्या समोर अश्व भगवे पताका खांद्यावर घेत 1800 वारकरी महिला- पुरुष आषाढी साठी पंढरपूर कडे राष्ट्रीय महामार्ग 52 वरण रवाना झालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker