क्राइम
शहागडाच्या दोघांना गोंदी पोलिसांनी उचलले

अबंड प्रतिनिधी: अबंड तालुक्यातील गुरुवारी 19 जून रोजी दुपारी गोंदी पोलिसांच्या पथकाने मागील गुन्ह्यात पाहिजे फरारी आरोपी आमेर गुलाब बागवान रा.वाळकेश्वर ता.अबंड व तडीपार आमोल वामन पंडित रा..दिशानगरी अंकुशनगर यांना राहत्या घरातून उचलण्यात आलेले असून यांच्यावर मागील वाळू तस्कंरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांना शुक्रवारी अंबड न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बालाजी पद्मने हे करीत आहेत.