क्राइममहाराष्ट्र

५०० ब्रास वाळूची चोरी, महसूलच्या फिर्यादीने गोंदीत २२ वाळू माफियांवर गुन्हे दाखल

गोंदीच्या सिद्धेश्वर पॉईंट येथील गोदावरी नदीपात्रातून २५ लाख रुपयांच्या ५०० ब्रास वाळूचा अवैध उपसा

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी :अबंड तालुक्यातील तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रातून अवैध रित्या २५ लाख रुपये किमतीचा ५०० ब्रास वाळू उपसा व वाहतूक केल्या प्रकरणी गोंदी येथील २२ वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हि कारवाई तहसिलदार विजय चव्हाण यांच्या आदेशाने महसूल विभागाने गुरुवारी रात्री उशीरा केली आहे.
गोंदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराततील गोदावरी नदी पात्राची अंबड तहसील गौण खनिज प्रतिबंधक पथकाने पाहणी केली. या दरम्यान त्या ठिकाणी अवैधरित्या साठा केलेले वाळूचे तीन ढिगारे आढळून आले अंदाजे ४० ते ५० ब्रास साठा हा आढळून आला. तर नदीपात्रात मोठ मोठे खड्डे दिसून आले असून महसूल पथकावर पाळत ठेवून केनीच्या सहाय्याने सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोदावरीनदी पात्रातून ५०० वाळू चोरीला केल्या प्रकरणी या वाळू माफियांवर गुन्हे दाखल
मंडळ अधिकारी कृष्णा सांडुजी एडके यांनी पंचनामा करून या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वरून किशोर प्रभू खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विशंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, अजिनाथ दत्ता शिदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, बाबा अर्जुनराव कुर्लेकर, स्वप्नील तात्या निरकड, अवधूत दत्ता मिटकुल, गणेश कैलास मिरकड, महेंद्र कचरू खराद, आण्णासाहेब संजय सोळुंके, कचरू उत्तम खराद, दत्ता रघुनाथ शिंदे, महावीर उत्तम खराद, दुर्गादास आसाराम विटोरे, पंकज सखाराम सोळंके, सुयोग मधुकर सोळंके, गजू उर्फ गजानन गणपत सोळुंके सर्व रा. गोंदी ता. अंबड यांच्या विरुद्ध भा.न्या.स. कलम 303(2), 3 (5) तह महाराष्ट्र जर्नीन महसूल अधिनीयम 1966 कलम 48(7), 48(8) सह गौण खनिज प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 प्रमाणे गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तडीपार असतानाही वाळू उपसा बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार असतानाही अवैध वाळू उपसा आरोप करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उपसा व इतर गुन्ह्यात आरोपी असलेल्या १० वाळू माफिया विरुद्ध तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सुयोग सोळुंके व गजू उर्फ गजानन गणपत सोळंके याचाही समावेश होता. तडीपार असतानाही गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात काही दिवसापूर्वी तडीपार असलेला सुयोग सोळुंके याने एकाला मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तडीपार असतानाही वाळू माफियाचा वावर असल्याचे समोर आले आहे.

शहागडच्या दोन जणांना गोंदी पोलिसांनी मागील वाळू चोरीच्या गुन्ह्यात उचललेले असून यामध्ये आमेर गुलाब बागवान रा.वाळकेश्वर ता.अबंड व आमोल वामन पंडित रा.अंकुशनगर दिशानगरी यास गोंदी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उचललेले होते. त्यांना शुक्रवारी अंबड न्यायालयात समोर हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker