क्राइममहाराष्ट्र
पाथरवाला खुर्द येथे बिबट्याने घेतला वासराचा बळी, शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण

अकबर शेख : अबंड प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द (गुंडेवाडी) येथील शेतकरी बळीराम बाबुराव घाडगे यांच्या शेतात गट.न. सतरा मध्ये गोठ्यात चार पाच जनावरे बांधली होती त्या मधील एक अडीच तीन वर्षाचे बिबट्याने खाल्ल असून शेतकऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
घटनास्थळी वनविभागअधिकारी एम.वी. पाटील, वनरक्षक अधिकारी के. कदम,वनमजूर संतोष राठोड ,व पशुअधिकारी डॉ. चव्हाण यांनी पंचनामा केला असून या वेळी शेतकरी गणेश खैरे ग्रा. प.सदस्य ,सखाराम घोडके ग्रा. प.सदस्य,दशरथ ढवळे,सचिन घाडगे, आत्माराम कदम,भगवान घाडगे, नवनाथ तिळे,सुजित हर्षे,प्रल्हाद घाडगे,रामदास ढवळे,बळीराम घाडगे व इतर शेतकरी उपस्थित होते तरी वनविभाग अधिकारी यांनी पिंजरा बसून बिबट्या पकडावा अशी शेतकरी वर्गात मागणी होत आहे.