क्राइम

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार पती-पत्नीला उडविले, घटना CCTV मध्ये कैद

पान टपरीचे लाखो रुपयांचे नुकसान

राजूर ते जालना रोडवर मानदेउळगाव या ठिकाणी कुक्कट पालन येथे मौलमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार्‍या दुचाकीस्वार पत्ती-पत्नीला भरधाव कंटेनर ने उडविल्याची घटना भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेञ राजुर येथे आज सकाळी घडली. ही घटना सिसी टिव्हीत कैद झालीय.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की वडाळा वालसा येथील रहिवासी असलेले शारदा वय(35)व माधवराव वय(40) एडके दांपत्य गेल्या अनेक दिवसांपासून जालना रोडवरील कुकुटपालन येथे रोजमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.आज सकाळी कुकुटपालन येथून देळेगव्हाण या गावाकडे येत असताना हा अपघात घडला.हा अपघात एवढा भयानक होता की,रस्त्याच्या कडेला असलेली पान टपरी चक्काचूर झाली असून त्यातील लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.माधवराव एडके व पत्नी शारदा एडके यांना स्थानिकांच्या मदतीने जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून दोघांचीही परिस्थिती अतीशय गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती नातेवाईक यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker