महाराष्ट्र
गोंदी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पुढाकाराने उपनिरीक्षक माऊली कटुंले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अंबड: अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याअंतर्गत शहागड पोलीस चौकीला कार्यरत असलेले उपनिरीक्षक माऊली कटुंले (साष्टपिंपळगाव बीट) यांचा ५७ वा वाढदिवस गुरुवारी सकाळी गोंदी पोलीस ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पुढाकाराने हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक किरण हावले, जमादार अशोक नागरगोजे, बामणवात, डोईफोडे, सचिन काळे, दीपक भोजने, शाकेर सिद्दिकी, सुरेश राठोड, हिवाळे, कावळे, कनसे यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी माऊली कटुंले यांना केक भरवून, हार, श्रीफळ आणि शाल देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.