महाराष्ट्र

आमच्यावेळी कुठे होत्या अशा टिचर ? एक नंबर तुझी कंबर गाण्यावर शिक्षिकेचा चिमुकल्यांसोबत भन्नाट डान्स ; नेटकरी झाले खूश

 अनेकांना आठवले शाळकरी दिवस 

दौंड प्रतिनिधी, हरिभाऊ बळी, ता. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका चिमुकल्यासोबत ” एक नंबर तुझी कंबर” गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय.
सोशल मीडियावर एक नंबर तुझी कंबर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह अबालवृद्ध, तरुण आणि सिनेकलावंताना सुद्धा आवरता आला नाही. सध्या सोशल मीडियावर ‘ एक नंबर तुझी कंबर’ ह्या गाण्यावर अनेकजण व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by D🕷️ (@dixhaaa_.17)

प्रत्येकांच्या शाळेच्या आठवणी वेगवेगळ्या असू शकतात. आणि प्रत्येकाच्या आठवणीतले काही शिक्षक देखील असतात. जे त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही खास गोष्टी शिकवत असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांकडून काही खास करून घेतात. अशातच एक सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा चिमुकल्यांसोबत भन्नाट डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायला होत आहे.‌ ज्यामध्ये ती शिक्षिका चिमुकल्यासोबत तसेच शिक्षकांच्या समोर एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker