शनिवार रात्री शहागड प्राथमिक आरोग्य केंद्राला कर्मचारी नव्हता उपलब्ध, संतप्त शिवसैनिकांनी ठोकले प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शनिवारी दहा वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील ढवळे नावाच्या व्यक्तीला हृदयविकार झटका आल्याने त्याला प्रथम दाखवण्यासाठी व रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याने नातेवाकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे भाव घेतली होती परंतु, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी इबत हाश्मी यांची बदली झाल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी नसून, गोंदी येथील बिराजदार यांच्याकडे पदभार आहे, तसेच सेकंड इमोवो म्हणून डॉ. वैष्णवी नरवडे यांची नियुक्ती असून त्यांनी दिवसभर कामकाज करत निघून गेलेल्या होत्या, या ठिकाणी शिपायाची नियुक्ती नसल्याने, या आरोग्य केंद्राच्या शिपाई सेवानिवृत्त झाल्याने या ठिकाणी रात्री ज्या सिस्टर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. त्या उपलब्ध नव्हत्या. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रात्री दहा वाजता बेवारस असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र शहागडला कुलूप ठोकले, यामध्ये सागर शिवसेना शहरप्रमुख विजय पुर्भे, जुनेद तांबोळी, चंद्रकांत लव्हाळे, सुदाम धोत्रे,यांनी कुलूप ठोकले यावेळी रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कुलूप ठोकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सावरा -सावरा करत ठोकलेले कुलूप काढले. परंतु आक्रमक शिवसैनिकांनी आमदार डॉ. हिकमत उढाण यांना फोन करत या पावसाळी आदेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे मागणी केलेले असून. शहागड प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी ही त्यांनी केलेली आहे.