जालना जिल्हा पोलीस दलात बदल्यांचा धडाका; 175 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

जालना | प्रतिनिधी
जालना जिल्हा पोलीस दलातील वार्षिक सर्वसाधारण बदली प्रक्रियेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI), पोलीस नाईक (PN), हवालदार (HC) तसेच पोलीस कर्मचारी (PC) अशा विविध संवर्गातील 175 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने रविवारी जारी केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत संबंधित कर्मचाऱ्यांच्या विनंत्या, कौटुंबिक अडचणी व कायदा-सुव्यवस्थेच्या गरजा विचारात घेऊन या बदल्या करण्यात आल्या.
बदली प्रक्रियेत अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी संधी देण्यात आली असून काहींना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय जालना, सदर बाजार, कदीम जालना, तालुका जालना, चंदनझिरा, अंबड, परतूर, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, हसनाबाद, पारध, मौजपुरी, तिर्थपुरी, गोंदी आदी ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची फेररचना करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गात चंद्रकांत बनसोडे (पोमु जालना), दिपक भट (श्वान पथक), रंजित खटावकर (घनसावंगी), तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील फकीरचंद सोनवणे, संतोष आडे, मिलिंद सिरसाट, विजयकुमार बिन्हाडे, दिलीप कांबळे, नितीन ढिल्पे यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बदल्यांमध्ये एएसआय ज्ञानदेव काळे यांची नियंत्रण कक्षातून कदीम जालना येथे, मनसुब नागवे यांची अंबडवरून जाफ्राबाद येथे, संतोष राऊत यांची सदर बाजारवरून भोकरदन येथे, धर्मा शिंदे यांची परतूरवरून तालुका जालना येथे, रामदास मते यांची अंबडवरून घनसावंगी येथे बदली करण्यात आली आहे.
पोलीस नाईक संवर्गात कन्हैया भंडारकर यांची पोलीस मुख्यालयातून कदीम जालना येथे, बाबासाहेब गायकवाड यांची कदीम जालनाहून स्थानिक गुन्हे शाखेत, हारुन पठाण यांची सदर बाजारवरून स्थानिक गुन्हे शाखेत, अनिल चव्हाण यांची चंदनझिराहून अंबड येथे तर चंद्रकला शडमल्यु यांची स्थानिक गुन्हे शाखेतून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
हवालदार संवर्गात शंकर परदेशी (गोंदी ते अंबड), सुभाष खरात (तालुका जालना ते अंबड), संतोष डोईफाडे (परतूर ते कदीम जालना), जगदीश बावणे (स्थानिक गुन्हे शाखा ते हसनाबाद), देविदास भोजने (स्थानिक गुन्हे शाखा ते तालुका जालना), प्रशांत लोखंडे (तालुका जालना ते स्थानिक गुन्हे शाखा), संदीप बेराड (पारध ते बदनापूर), राजाभाऊ वाघमारे (सदर बाजार ते अंबड), साईनाथ पवार (चंदनझिरा ते घनसावंगी), जितेंद्र तागवाले (चंदनझिरा ते अंबड), अविनाश नरवडे (अंबड ते चंदनझिरा), गजानन धाईत (घनसावंगी ते गोंदी) आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस कर्मचारी संवर्गात विकांत गायकवाड यांची पोलीस मुख्यालयातून सदर बाजार जालना येथे, विष्णू बाध यांची पोलीस मुख्यालयातून परतूर येथे, कानबाराव हराळ यांची मंठाहून परतूर येथे, रवी काळे यांची चंदनझिराहून सदर बाजार येथे, प्रतापसिंग सतवन यांची अंबडहून जाफ्राबाद येथे, किशोर पुंगळे यांची स्थानिक गुन्हे शाखेतून चंदनझिरा येथे, रामेश्वर राऊत यांची कदीम जालनाहून अंबड येथे, गणेश तेजनकर यांची जाफ्राबादहून सदर बाजार येथे, प्रदीप करतारे यांची सदर बाजारहून स्थानिक गुन्हे शाखेत, आकाश कुरील यांची बदनापूरहून तालुका जालना येथे, रामसिंग घुसिगे यांची सदर बाजारहून पोलीस मुख्यालयात, आकाश खरात यांची पोलीस मुख्यालयातून सदर बाजार येथे, नसिम पठाण यांची सदर बाजारहून जाफ्राबाद येथे, वसंत धस यांची तालुका जालनाहून स्थानिक गुन्हे शाखेत, संतोष बनकर यांची मंठाहून भोकरदन येथे, सतिश शेजूळ यांची जाफ्राबादहून हसनाबाद येथे, शरद शिंदे यांची भोकरदनहून पारध येथे आणि दशरथ गोपनवाड यांची परतूरहून आष्टी येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, बदली आदेश प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधित शाखा प्रमुखांना दिले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही बदली प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.



