क्राइममहाराष्ट्र

पाथरी शहरात भरदिवसा जबरी घरफोडी; १५ लाखांचे दागिने आणि १ लाख रोख रक्कम लंपास!

भास्कर पंडित : पाथरी
पाथरी शहरातील माळीवाडा भागातील व्यापारी साहेबराव मानोलीकर यांच्या घरी भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १६ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना १२ जून गुरुवारी दुपारी २.३० वाजता घडली. या जबरी घरफोडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू केली आहे.
शहरातील माळीवाडा येथील साहेबराव मानोलीकर यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली. मानोलीकर यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब तिकडे गेले होते. मानोलीकर यांच्या घरापासून अगदी ५०० मीटरवर त्यांच्या पाहुण्यांचे घर होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून कपाटातील मोठ्या प्रमाणात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली, अशी माहिती साहेबराव मानोलीकर यांनी दिली.
घटनेची माहिती समजताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी डॉगस्कॉडला पाचारण केले असून, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
नागरिकांत भीतीचे वातावरण – भरदिवसा घरफोडीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!
घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून डॉगस्कॉड मागवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker