क्राइममहाराष्ट्र

एक लोटर, चार ट्रॅक्टर, बुलेट गोंदी पोलिसांनी गोदापात्रात पकडली

22 लाखांचा मुद्देमाल जप्त 7 जणांवर गुन्हा दाखल करत केली अटक

अकबर शेख, अंबड प्रतिनिधी: अंबड तालुक्यातील गंगाचिंचोली येथील गोदावरी नदीपात्रात गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे, जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हजारे, पो.कॉ. शाकेर सिद्दीकी, दीपक भोजने, प्रदीप हवाळे, वहाब शेख आणि सचिन काळे यांनी छापा टाकला.

गंगाचिंचोली गोदावरी नदीपात्रात लोडरच्या साहाय्याने ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू उत्खनन करून ती ट्रॅक्टरमध्ये भरून चोरटी वाहतूक केली जात असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांना पाहताच कच्च्या रस्त्याने सहा ट्रॅक्टर आणि एक लोडर घेऊन पळणाऱ्या वाहनांचा पाठलाग करत पोलिसांनी एक ट्रॅक्टर व लोडर पकडले. पळून गेलेले ट्रॅक्टर व लोडर जप्त करून गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात आले आहेत. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात कलम 303(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, दुसऱ्या कारवाईत शहागड येथील गोदावरी नदीपात्रात वाळकेश्वर कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ वाळू तस्कर ट्रॅक्टरला केनीच्या साहाय्याने नदीपात्रात पाणी असतानाही वाळू काढत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पोलीस जाताच वाळू चोरांना पोलिसांची चाहूल लागल्याने ते ट्रॅक्टर व केणीसह पळून गेले. गुप्त बातमीदारांमार्फत 3 वाळू चोरांची नावे निष्पन्न झाली असून, घटनास्थळी वाळूसाठी लोकेशन देणाऱ्यांची बुलेट गाडी मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कलम 303(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 22 लाखांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युवराज दिगंबर गुळवणे, द्वारकादास भीमराव गुळवणे, कृष्णा निवृत्ती धाये, कृष्णा गंगाधर शिंदे (सर्व रा. कोठाळा खुर्द, ता. अंबड), संजय सुभाष उंबरे, गणेश शांतीलाल उंबरे (दोघे रा. शहागड), आकाश मधुकर येटाळे (रा. वाळकेश्वर) हे आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. अंबड न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या 7 वाळूचोरांना अटक करण्यात आली असून, 1 ट्रॅक्टर लोडर, 4 ट्रॅक्टर आणि 1 बुलेट असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे आणि रामदास केंद्रे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker