शहागड, वाळकेश्वरच्या तीन वाळूमाफिया विरूद्ध कारवाई, माफिया पळाले
लोकेशन पंटरची बुलेट पकडली

अकबर शेख । अबंड
वाळकेश्र्वर (ता.अंबड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून शहागडचे दोन, वाळकेश्र्वर चा एक तीन वाळू माफिया उत्खनन व वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, जमादार रामदास केंद्रे, चालक साठे, हवाळे, काळे आदींच्या पथकाने गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन छापा टाकला असता, वाळू माफिया संजय सुभाष उंबरे, गणेश शांतीलाल उंबरे, (दोन्ही रा. शहागड), आकाश मधुकर येटाळे रा. वाळकेश्र्वर तीनही वाळू काढणारे केणीच्या ट्रॅक्टरसह पळून गेले.
दरम्यान पोलिसांचे लोकेशन ठेवणारा पंटर ची बुलेट एम.एच.१२.आर.एच.५५४२ दोन लाख रुपये किंमतीची दुचाकी मात्र पोलिसांनी जप्त केली. तीनही अवैध वाळू माफिया विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार रामदास केंद्रे करत आहेत. या कार्यवाहीने लोकेशन पंटरसह वाळू तस्कंराचे धाबे दणाणलेले आहे.