महाराष्ट्र
जालना स्थानिक गुन्हे शाखेतील देविदास भोजने यांची पदोन्नती!

अंबड प्रतिनिधी: जालना स्थानिक गुन्हे शाखेत (Local Crime Branch) कार्यरत असलेले आणि अंबड शहरातही काम पाहिलेले देविदास भोजने यांची १ जुलै रोजी हवालदारपदी पदोन्नती झाली आहे. या संदर्भात जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी परिपत्रक काढले आहे. पोलिस दलात सेवेनुसार पदोन्नती मिळत असते, आणि याच नियमानुसार भोजने यांना ही बढती मिळाली आहे.
देविदास भोजने हे अंबड तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवारातून त्यांचे कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.