बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त पीएसआय खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

भंडारा: “माणसाच्या आयुष्याचा भरवसा नाही,” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरवणारी एक धक्कादायक घटना भंडारा शहरात घडली आहे. बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव चिंधालोरे (वय ६०) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंधालोरे यांना तातडीने उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता. निवृत्तीनंतर स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी ते नियमितपणे बॅडमिंटन खेळायला येत होते. मात्र, आज खेळता खेळता अचानक ते कोसळले आणि यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरली असून, हृदयविकाराचा झटका हेच त्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे बोलले जात आहे.