राष्ट्रीय महामार्ग 52 वर गहिनीनाथ नगर जवळ बसचा टायरच निखळला, 60 वारकरी बचावले
दुचाकीस्वार विठ्ठल रंधवे कृष्णा नगर अंतरवाली सराटी यांनी भाविकांचे वाचवले प्राण

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील गहिनीनाथ नगर महाकाळ रविवारी चार वाजता पंढरपूरहुन पांडुरंगाचे दर्शन करत साठ महिला-पुरुष, लहान मुले वयोवृद्ध प्रवासी असलेली छत्रपती संभाजी नगर आगाराची बस क्र.एम.एच.20 बी.एल.1697 हि राष्ट्रीय महामार्ग 52 वरण जात असतांनाच विठ्ठल रंधवे कृष्णा नगर अंतरवाली सराटी यांनी या बसचे पाठीमागील चाक निखळलेले पाहिले यावरण त्यांनी बसला दुचाकी आडवी लावत बस थांबवली, यामुळे बसमधील प्रवास करीत असलेल्या 60 प्रवासांचा जीव वाचला, देव तारी त्याला कोण मारी अशा म्हणी प्रमाणे सर्व प्रवासी सुखरूप असून, पांडुरंगाने पाठवलेला दुत विठ्ठल रंधवे यांचे सर्व प्रवासाने आभार मानले, यावेळी विठ्ठल रंधवे यांनी चालकाला जाब विचारला चालकाला टायर निखळूस्तर हि बाब कशी लक्षात आली नाही.जवळच्या टायर गॅरेज मध्ये चालकाने बसमधील स्टेपनी लावत बस दुरुस्त करून बस छत्रपती संभाजी नगर आगाराकडे नेली, यावेळी बस प्रवासांनी दुसऱ्या बसचा आधार घेतला. हि विना वाहक बस पंढरपूर ते छत्रपती संभाजी नगर होती. ही बस संभाजीनगर आगाराची असून, चालकाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याने आपले नावही सांगण्यास नकार दिला.
राष्ट्रीय महामार्गावर असे नादुरुस्त बसेस पाठवून महामंडळ प्रवासी आणि भाविकांच्या जिवाशी खेळत आहे. ज्यांनी अशी नादुरुस्त बस पाठवले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
विठ्ठल रंधवे या नागरिकांनी केलेली आहे.