महाराष्ट्र
आषाढी एकादशीला मुक्ताई दिंडी अंबडमध्ये

अबंड प्रतिनिधी : अबंड शहरांमध्ये, संत मुक्ताबाई दिंडी दि.17 जून रोजी मंगळवार श्री. मत्स्योदरी देवी संस्थान परिसरात येत असून मत्स्योदरी देवीच्या व्यवस्थापन समितीने याची पूर्वतयारी केलेली असून दरवर्षीप्रमाणे दि. 18 जून रोजी सकाळी पाच वाजता संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री. विजय चव्हाण सह पत्नी यांच्या हस्ते श्री. संत मुक्ताई पालखीचा अभिषेक होईल व नंतर संस्थान तर्फे वारकरी मंडळीसाठी आयोजित केलेल्या नाश्त्याचा कार्यक्रम होईल.अशी माहिती कैलास शिंदे व्यवस्थापक, श्री. मत्स्योदरी देवी संस्थान यांनी पोलीस न्युज यांना बोलतांना दिली. यावेळी अबंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी मोठा बंदोबस्त मागीतलेला आहे.