महाराष्ट्र
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तीन कर्मचारी सेवानिवृत्त, शिक्षण विभागाच्या वतीने निरोप समारंभ

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, वरिष्ठ लिपिक बाबूराव पिल्लई, कनिष्ठ लिपिक पंजाब खिल्लारे यांचा सेवा काळ संपल्याने दि.३० जून सोमवारी सेवानिवृत्त झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीनही कर्मचारी एकाच दिवशी सेवावृत्त झाले असल्याने त्यांचा निरोप व सत्कार समारंभ जिल्हा परिषदेच्या जालना सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी देशमुख, वरिष्ठ लिपिक पिल्लई, कनिष्ठ लिपिक पंजाब खिल्लारे यांचा सपत्नीक सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी



