क्राइममहाराष्ट्र

कत्तलीसाठी जाणारी 28 गोवंशीय जनावरांची सदर बाजार पोलिसांनी केली सुटका

भोकरदनचे गजानन राऊत आणि सोयगांवचे शेख साजिद यांच्या मालकीची जनावरे, 2 जण पोलिसांच्या ताब्यात, 48. 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस न्युज नेटवर्क/जालना

बंद असलेल्या कंटेनर मध्ये  अवैधरित्या 28 गोवंशीय जनावरे कोंबुन लातुर जिल्ह्यात घेवुन जाणार्‍या दोघा जणांना जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकत 49 लाख रुपयाचे गोवंशीय जनावरे आणि कंटेनर जप्त केलंय.
भोकरदन कडुन जालना मार्गे एका कंटेनर क्रमांक (एमएच04 एलक्यु 8802) मधून गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना काल राञी मिळाली होती. त्या माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाण्याचे डिबी प्रमूख शैलेश म्हस्के यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहीती देत आपल्या पथकासह कन्हैयानगर चौफुली चौकात सापळा लावला,माञ सदरील कंटेनर चालकांने पोलीसांना बघताच आपले कंटेनर भरधाव वेगात छञपती संभाजीनगरच्या दिशेने वळविले,पोलीसांनी कंटेनरचा पाठलाग करत हा कंटेनर संभाजीनगर रोडवरील चंदनझिरा हद्दीत टोलनाक्यावर अडविला, तेथुन पोलीसांनी हा कंटेनर राममुर्ती परिसरातील एका गौशाळेवर आणला,आणि त्या ठिकाणी गौवंशीय जनावरांना गौशाळेत सोडुन जनावरांची सुटका केली.
दरम्यान सदर बाजार पोलीसांनी कंटेनर जप्त करत चालकांची विचारपुस केली असता त्यांने सांगितले की सदरील गोवंशीय जनावरे आम्ही लातुर जिल्ह्यातील जाम येथे कत्तलीसाठी घेवुन जात असल्याची कबुली दीलीय.तर सदरील 28 गोवंशीय जनावरे हे भोकरदन तालुक्यातील सोयगांव देवी यैथील गजानन राऊत आणि सिल्लोड येथील शेख साजिद यांच्या मालकीचे असुन सदर बाजार पोलीसांनी कंटेनर चालक शेख सलिम शेख सुल्तान वय-२५ वर्ष,रा.अब्दुल शहा नगर सिल्लोड,सहकारी शेखअमिन शेख बशीर राहणार सिल्लोड या दोघांना अटक केली असुन शेख मुज्जू शेख आयुब हा अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला,यांच्या सह कत्तलीसाठी गोवश विक्री करणारे गजानन राऊत आणि शेख साजिद अशा एकुण पाच जणावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संदीप भारती,डिबी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक शैलेश म्हस्के,अमंलदार रामप्रसाद रंगे,जगन्नाथ जाधव,नजीर पटेल,गणेश तेजणकर,दुर्गेश गोफणे,पोलीस शिपाही शेख अजिम,राहुल कटकम,लोंढे,वाहन चालक कल्पेश पाटील आणि चालक ग्रेड पोलीस उपनिरिक्षक हिवाळे यानी केलीय.
पोलिसांनी कारवाई करून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला कंटेनरला पकडले आहे. या कारवाईत 28 जनावरांची पोलिसांनी सुटका करत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker