संत श्री. मुक्ताबाई पालखीचे अबंड तालुक्यात आगमन; विविध ठिकाणी स्वागत : नागरिकांनी घेतली दर्शन

अकबर शेख
अबंड प्रतिनिधी : अबंड येथे 17 जून रोजी मुक्कामी असली संत श्री. मुक्ताबाई पालखीचे आगमन अंबड तालुक्यात झालेली असून 18 जून बुधवारी सकाळी अंबड येथून पालखीने प्रस्थान केलेले असून पालखी 1800
वारकरी महिला -पुरुष तरुण युवती युवक, वयोवृद्ध वारकरी,संत श्री. मुक्ताई संस्थांचे हे
हा.भ.प.महाराज मंडळी व वारकरी या दिंडी सोहळ्याचा अनुभव घेत असून, मोठ्या हर्ष उल्हासाने विविध ठिकाणी पालखी मार्गाच्या गावामध्ये गावकरी नागरिक शेतकरी पालखीचे स्वागत करून संत श्री. मुक्ताई पालखीचे दर्शन घेत आहे. यावेळी पालखी मुक्कामी वडीगोद्री येथील संत श्री गुरुदेव आश्रम येथे मुक्कामी राहणार असून, सकाळी शहागड येथे दहा वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 52 वर्ण गेवराई कडे गुरुवारी प्रस्थान करेल, यासाठी नागरिकांनी चहा नाश्ता व रांगोळी सडा-सारवण यांची व्यवस्था केलेली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अबंड-घनसावंगी, तिर्थपुरी,शहागड हायवे ट्राफिकेतील बंदोबस्त 30 पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
गोपीनये शाखेचे सचिन साळवे संतोष डोईफोडे, अंकुश पठाडे, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर कटुंले, फुलचंद हाजारे, रामदास केंद्रे,दिपक भोजने,शाकेर सिद्दीकी, प्रदिप हावाळे, महिला पोलिस मिरा मुसळे, श्रीमती आद्रट, हायवे ट्राफिकेचे बघाटे,राठोड हे दिंडी सोबत बंदोबस्तासाठी तैनात आहेत.