शिक्षण समितीच्या मागणीला यश सातेफळ शाळेला मिळाले शिक्षक :मारुती बनकर

जाफराबाद:
जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचे पद रिक्त असल्याने ते पद तातडीने भराव यासाठी शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून वेळोवेळी संबधित विभागाकडे मागणी केली त्याबरोबर गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असता तातडीने शाळेला दोन शिक्षक मिळाले असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष मारुती बनकर यांनी सांगितले.
श्री बनकर म्हणाले की ,सातेफळ येथील जिल्हा परिषद शाळा पहिली ते आठवी असून विद्यार्थी संख्या 206 आहेत. परंतु गेल्या वर्षांपासून शिक्षकांचे पद रिक्त होते. ते पद भरण्यासाठी आम्ही शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी केंद्रप्रमुख गजानन माटे यांच्यासह शिक्षक विभागाकडे मागणी केली सुरू होती. यासाठी गावकऱ्यांनीही ग्रामपंचायत च्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यांची तातडीने दखल घेत शिक्षण विभागाने पद भरले असल्याचे श्री बनकर यांनी सांगितले .संबधित शिक्षक आज शाळेवर आल्यावर शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागाने गावकऱ्यांची मागणी मान्य कल्याने शिक्षण समितीचे उपाध्यक्ष उर्मिला सुभाष बनकर,सदस्य संजय तेजराव खंदारे,उमाजी लिबाजी बनकर,राजेंद्र राऊत,विलास बनकर ,विठ्ठल घाडगे आदींसह गावकऱ्यांनी आभार मानले आहे.