क्राइम

अंबड तालुक्यातील बक्षाचीवाडी येथे जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस पथकाची धाड

पाच दुचाकी, १४ मोबाईल, रोख ५ हजार रुपये जप्त; १६ जुगारांविरोधात गुन्हा दाखल, ८ फरार

अकबर शेख, अंबड प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील बक्षाचीवाडी येथील एका शेतात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘तिरट’ नावाच्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस पथकाने धाड टाकली. या कारवाईत ५ दुचाकी, १४ मोबाईल फोन आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १६ जुगारांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार असलेल्या ८ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
कारवाईचा तपशील:
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ काशिनाथ ढाकणे यांना बक्षाचीवाडी येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस जमादार चव्हाण आणि नरवडे यांच्यासह आदिनाथ ढाकणे यांनी शनिवारी, २१ जून रोजी रात्री धाड टाकली.
आरोपींची नावे:
या धाडीत पत्त्यांचा जुगार खेळताना मुख्य आरोपी दिलीप वसंत राठोड (वय ४८, रा. बक्षाचीवाडी, ता. अंबड) याच्यासह कल्याण गणपत गवळी (वय ५०, रा. सौदलगाव, ता. अंबड), अंबादास नाथाजी जाधव (वय ५२, रा. जामखेड), विलास मनोहर डाखोरकर (वय ५०, लखमापुरी), अबुभाई दादाभाई शेख (वय ५६, रा. पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), भगवान बारकु ढाकणे (वय ५५, कंडारी, ता. बदनापूर), दिलीप साहु पवार (वय ३५, सोनकपिंपळगाव तांडा), विश्वनाथ भाऊसाहेब काळे (वय ४३, पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), राजू भिमा म्हस्के (रा. जामखेड), अनिल सुधाकर खरात (वय ३२, लालवाडी), रविंद्र भानुदास गायकवाड (वय २८, रा. मुद्दलवाडी, ता. पैठण), हरीदास राजधर उन्हाळे (वय ३०, रा. आवा-अंतरवाला, ता. जालना), जनार्धन भाऊराव चव्हाण (वय ४३, रा. मानेगाव), प्रल्हाद आसाराम सुलाने (रा. दौडवाडी) आणि ज्ञानेश्वर सांडूजी जैवाळ (वय ५०, रा. दाभाडी, ता. बदनापूर) हे मिळून आले.

पोलिसांना पाहून इतर ८ व्यक्ती पळून गेल्या असून, त्यांची नावे आणि पत्ता शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.

या प्रकरणी उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे (उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड) यांच्या फिर्यादीवरून कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार चव्हाण हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker