सोलर प्लॅण्टवर चोरी करणार्या चोरट्यांचा मारहाणीत मृत्यु
सुरक्षा रक्षकासह सात जण अंबड पोलीसांच्या ताब्यात

अकबर शेख : अबंड
अंबड तालुक्यातील जामखेड येथे असलेल्या टाटाच्या सोलर पॅनल प्लॅंट वर काल शनिवारी राञी केबल चोरी करण्याच्या प्रयत्न करणार्या चोरट्यास सुरक्षा रक्षकांनी पकडुन केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यु झाला
बीड जिल्ह्यातील सिदोड येथील उमाराव देवराव काळे हा आपल्या सहकार्यासह अंबड तालुक्यातील जामखेड शिवारात असलेल्या सोलर प्लन्ट वरुन केबल चोरी करत असतांना काल राञी सुरक्षा रक्षकांनी पकडुन त्यास लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.घटनेची माहीती अंबड पोलीसांना कळताच पोलीस उपनिरिक्षक भगवान नरोडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खांबे आणि पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांना कल्पना देत राञी उशिरा आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, जख्मी उमाराव यास तात्काल अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले माञ प्रकृती चिंताजनक असल्याने जालना येथे रेफर केले. लाठ्या-काठ्याच्या मारहाणीत गंभीर जख्मी झालेल्या उमारावचा रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यु झाला झाल्याचे कळते.उमाराव या चोरट्यास मारहाण करणार्या जवळपास सात लोकांना अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक भगवान नरोडे,दिपक पाटील,अरुण मुंडे,स्वप्नील भिसे आणि नागवे यांनी ताब्यात घेतले तर अन्य लोकांच्या शोधार्थ पथक रवाना झालं आहे.
या प्रकरणी मयतावर उत्तरीय तपासणी केली जात असुन नातेवाईकांनी गर्दी केली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.